घुघुस - शहरातील गांधीनगर येथे राहणाऱ्या 21 वर्षीय सौरव गनगोती या युवकाने 25 ऑगस्टला स्वतःवर घडलेल्या थरारक प्रकाराची तक्रार दाखल केली.
सौरव चा मित्र सोनल रॉबर्ट याने 5 महिन्यांपूर्वी कुटुंबातील सदस्यांना बाहेर घेऊन जायचे आहे असे सांगत सौरव ला चारचाकी वाहन मागितले होते, मात्र वाहनाच्या दुरुस्ती करायची आहे असे सौरवने सोनल ला सांगितले मात्र कार नाही दिली म्हणून त्याचा राग सोनलने आपल्या मनात ठेवला होता.
25 ऑगस्टला सौरव हा नेहमीप्रमाणे आपल्या घराजवळ आपल्या मित्रांसोबत बसला होता, काही क्षणात सोनल रॉबर्ट हा त्याठिकाणी आला व त्याने सौरवला "चल तुझे जन्नत दिखाता" असे म्हणत बाजूला नेले, सोनल ने सौरवच्या कानशिलात हाणत, तू मला कार का दिली नाही असे म्हणत त्याच्या छातीवर बंदूक ठेवली.
अचानक घडलेल्या ह्या प्रकाराने सौरव घाबरला, व लगेच घराच्या दिशेने धावत, घरचा दरवाजा बंद केला.
सोनल ने बंदूक हातात घेत त्या परिसरात दहशत पसरविण्याचा प्रकार केला, सौरव ने तात्काळ पोलिसांना संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला, पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत सोनल ला ताब्यात घेतले, मात्र ती बंदूक बघत पोलिसही आश्चर्य चकित झाले कारण ती बंदूक म्हणजे लायटर चा प्रकार होता.
सोनल रॉबर्ट हा आधीपासून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणत, जामिनावर सोडले.
आज सोनल ने नकली बंदुकीने परिसरात दहशत माजविण्याचा प्रकार केला उद्या खरी बंदूक आणत तो कुणावरही हल्ला करू शकतो अश्या युवकांवर पोलिसांनी आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
