घुघुस - शहरात मागील अनेक महिन्यापासून घरफोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून पोलीस यंत्रणा सुद्धा या प्रकारावर आळा घालण्यास अपयशी ठरत आहे.
शहरातील साईनगर वार्डात राहणारे 60 वर्षीय प्रकाश महादेव होकम हे कामानिमित्त 24 ऑगस्टला कुटुंबासाहित हिंगणघाट येथे गेले होते, 26 ऑगस्टला होकम हे परत आल्यावर घरातील सामान अस्तव्यस्त आढळून आले असता त्यांनी अलमारी तपासून बघितली त्यामध्ये ठेवलेली 15 हजारांची रोख रक्कम व 35 हजारांचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याची खात्री पटताच होकम यांनी तात्काळ घुगुस पोलीस स्टेशनला अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करीत घटनेचा तपास सुरू केला आहे.
मागील अनेक महिन्यापासून शहरात अनेक भागात चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढत आहे, पोलीस यंत्रनेणी परिसरात गस्त वाढवावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
