चंद्रपुर - जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता मा.पोलीस अधिक्षक , चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मा . बाळासाहेब खाडे यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत निर्देश दिले होते दि . २५/०८/२०२१ रोजी पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा , चंद्रपुर यांचा मार्गदर्शनाखाली चंद्रपुर डिव्हीजन पथक स्थानिक गुन्हे शाखा , चंद्रपुर हे मोसा चोरीचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिग राबवीत असतांना रेल्वे स्टेशन चौक बल्लारशा येथे सापळा रचून पो.स्टे बल्लारशाह रेकॉर्ड वरील मोसा गुन्हेगार नितिन नथ्थुजी मारबते वय २१ वर्ष रा . जिजामाता चौक वॉर्ड कं १ नांदाफाटा गडचांदुर याचे ताब्यातील बिनाकागदपत्राचे एक लाल रंगाची पॅशन प्रो - गाडी कं MH - 34 AK - 1208 हि गाडी ताब्यात घेण्यात आली . त्यास सदर गाडीचे कागदपत्र मागीतले असता त्याने कागदपत्र नसल्याचे सांगितले . त्याने प्रथम उडवा - उडवीचे व असमाधानकारक उत्तर देऊ लागल्याने त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने सदर गाडी ही अंदाजे २ महीण्या अगोदर नारंडा फाटा , कोरपना गडचांदूर येथून चोरली असे सांगितले . त्यास पुन्हा विचारपूस केली असता ८ मो.सा.चोरी केल्याचे सांगीतले त्याचेकडुन रेल्वे स्टेशन पार्कीग बल्लारशा , चंद्रपुर , मौजा ढाकोली ता . शिरपुर जि . यवतमाळ येथुन नमुद मो.सा. हस्तगत केलेल्या आहे . नमुद आरोपीकडुन पो.स्टे . कोरपना , अप.क. ९ ० / २०२१ कलम ३७ ९ भादवी , पो.स्टे . गडचांदुर अप.क. ३०७/२०२१ कलम ३७ ९ भादंवी , अप.क. ३०५/२०२१ कलम ३७ ९ भादंवी , अप.क. १ ९९ / २०२० कलम ३७ ९ भादंवी , पो.स्टे . रामनगर , अप.क .१५ ९ / २०२१ कलम ३७ ९ भादंवी , पो . स्टे . चंद्रपुर शहर , अप.क. ६ ९ ७ / २०२१ कलम ३७ ९ भादंवी , असे एकुन सहा ( ६ ) गुन्हे उघडकीस आलेले आहे.
