जिवती - वणी खुर्द येथे शनिवारी हुके व कांबळे कुटुंबियांना जादूटोण्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला.
या मारहाणीत 7 जण जखमी झाले होते ज्यामध्ये शांताबाई कांबळे (53), शिवराज कांबळे (74), साहेबराव हुके (48), धम्मशीला हुके (38), पंचफुला हुके (55), प्रयागबाई हुके (64), एकनाथ हुके (70) यांचा समावेश होता.
सध्या 7 पैकी 5 पीडित चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. News 34
पीडित कुटुंबांच्या चेहऱ्यावर आजही त्या घटनेची दहशत व्याप्त आहे, पीडित हुके व कांबळे परिवारातील सदस्यांनी शनिवारच्या त्या घटनेची वाच्यता केली, त्यांनी सांगितले की गुरुवारी मोहरम ची सवारी बसविण्यात आली व शुक्रवारी काहींच्या अंगात भानामती आली असता त्यांनी हुके व कांबळे कुटुंब गावात जादूटोणा करीत असल्याचे सांगितले.
शनिवारी दोन्ही कुटुंबांना समज घालण्याचे सांगत चौकात बोलाविले, मात्र चौकात जाताच आम्हाला सर्वांनी मिळून मारहाण केली, आमचे हात पाय बांधण्यात आले.
ही बाब पोलिसांना कळली असता त्यांनी गावात येण्याचा प्रयत्न केला मात्र काहींनी त्यांचा रस्ता अडविला, मात्र पोलिसांनी आपले कर्तव्य बजावीत आम्हाला तिथून सोडविले.
पोलीस दादा आले म्हणून आमचे कुटुंबातील सदस्य वाचले अशी प्रतिक्रिया पीडित कुटुंबातील व्यक्तींनी दिली.
वणी खुर्द येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी काहींचे समुपदेशन केले असून सध्या गावात शांतता आहे, मारहाण प्रकरणी जिवती पोलिसांनी 13 आरोपींना अटक केली आहे.