कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
एका वृत्तपत्र व पोर्टलचे तालुका प्रतिनिधी तथा कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सैय्यद मूम्ताज़ अली यांनी विजय ठाकरे यांच्या लेखी तक्रारीवरून तामसी रिठ पैनगंगा नदीतील रेती चोरी प्रकरणी बातमी काही दिवसांपूर्वी प्रकाशीत केली होती.याचा राग मनात धरून कोरपनाचे तहसीलदार वाकलेकर यांनी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे पत्रकार अली यांच्या विरोधात तक्रार दाखल करून गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांवर दबावतंत्राचा वापर केला.मात्र कायद्याचे रक्षणकर्ते पोलीसांनी सदर प्रकरणी योग्य ती कारवाई केली आहे.तहसीलदार वाकलेकर यांचे हे कृत्य त्यांच्या पदाला न शोभणारे असून तहसीलदार हे स्वतः कायद्याचे पालन करणारे तालुका दंडाधिकारी म्हणून एक जबाबदार पदावर विराजमान अधिकारी आहेत.हे जर आपल्या पदाचा गैरवापर करून पत्रकार अली यांच्यावर सुडबुदद्धीने आपला वचपा काढण्यासाठी असे वागत असेल तर ही बाब अतिशय निंदनीय व पत्रकार स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे. सदर प्रकरणी काही सुज्ञ नागरिकांनी तहसीलदार यांच्या या कृत्याचा अशा प्रकारे निषेध करत खंत व्यक्त केली आहे.
