चंद्रपूर :  आम आदमी पक्षातर्फे संपूर्ण शहरात "चंद्रपूर में भी केजरीवाल" हे वॉल पेंटिंग अभियान चालू होते.  त्यामध्ये शहरातील अनेक भिंतीवर चंद्रपूर मे भी केजरीवाल हे लिहिण्यात आलेले आहेत. त्यामुळे शहरात येणाऱ्या जाणाऱ्या अनेक नागरीकांना येता जाता हे लिखाण दिसत आहे. या लिखाणामुळे अरविंद केजरीवाल व आम आदमी पक्षाची लोकप्रियता वाढत असून, लोकांना दिल्ली मॉडेल डोळ्या समोर येऊन दिल्लीत झालेली क्रांती, लोकांकरिता करण्यात आलेले विकासकामे लक्षात येत आहे. मात्र, चंद्रपूर शहर महानगरपालिकेने आम आदमी पक्षाच्या वॉल पेंटिंगसंदर्भात नोटिस पाठविली आहे. 
Aam Aadmi Party chandrapur
सत्ताधारी स्वतःच्या नेत्यांचे बॅनर लावतात. रस्त्यावर, दुभाजकावर बेकायदेशीररित्या बॅनर लावण्यात आले आहेत. चंद्रपूर शहर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता कर विभागाचा महसूल बुडवून बॅनरबाजी सुरु आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही. फक्त आम आदमी पार्टीची शहरात एंट्री होताच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच नोटीस पाठवून अशी कारवाईची धमकी दिली आहे. 
चंद्रपूर में भी केजरीवाल याच वॉल पेंटिंग मुळे लोकांमध्ये तर चांगला मॅसेज जात आहे पण विरोधकांच्या पोटात दुखत आहे म्हणून सत्ताधार्यांनी एकीकडे संपूर्ण शहर खड्ड्यात टाकलेल आहे आणि आम आदमी पक्षावर दबाव टाकण्याकरीता खालच्या पातळीवर गेले आहेत. एकीकडे भाजपा स्वतः स्ट्रीट लाइट वर विकास पुरूषांचे फोटो, महापौर तथा ईतर पदाधिकारी यांचे पोस्टर लाउन स्वता डोळे बंद करुण विद्रुपीकरण करीत आहेत, त्याकडे कोन बघणार? अमृत कलश योजनेच्या नावावर संपूर्ण शहरातील शासकीय रस्ते खोदून टाकले आहेत. पब्लिक प्राॅपर्टी डॅमेज करुण ठेवली आहेत. अशी टीका आप युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी केली आहे.
