चंद्रपूर - वर्ष 2015 ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा करण्यात आली होती मात्र कालांतराने राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने महाविकास आघाडी सरकारने ही दारूबंदी उठवली.
सध्या नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत सरकार फक्त पैश्याकडे लक्ष देत आहे, दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाला राज्यभरातून सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध करायला हवा मात्र तसे काही झाले नाही, मात्र मी स्वतः सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत अशी माहिती आज जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिली आहे. Anna Hazare
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यावर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सतत गुन्हेगारी वाढत आहे.
या दारूमुळे महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे मात्र सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे, त्यांना फक्त या मार्गातून कर वसूल करायचा आहे हे धोरण अत्यंत चुकीचे असून मी आता या विरोधात लढा देत उच्च न्यायालयात दाद मागणार अशी माहिती अण्णा हजारे यांनी दिली आहे.
