प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - शहरातील राजकीय पदाधिकाऱ्याने
24 वर्षीय युवतीचा मानसिक छळ करीत विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
24 वर्षीय युवतीने याबद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की मागील 6 महिन्यांपूर्वी अमन मारोती सोमकुवर यांच्याकडे मजुरी करण्याचे कामासाठी जात होती, मात्र 3 महिण्याआधी त्या युवतीने कामावर जाणे बंद केले. News34
ती कामावर येत नाही म्हणून अमन ने तिला वारंवार फोन करून त्रास देणे सुरू केले, माझ्यासोबत लग्न कर असे म्हणत तिला तो त्रास देऊ लागला, त्या युवतीने अमन चा नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून दिला.
ही बाब युवतीने आपल्या आई वडिलांना सांगितली, अमन ला घरी बोलावून समज सुद्धा दिली, मात्र त्यानंतर अमन घरासमोर येत माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझी बदनामी करणार अशी धमकी देऊ लागला, इतकेच नव्हे तर त्याने मी आत्महत्या करतो व तुम्हाला फसवितो असे म्हणत पीडित युवतीला मानसिक त्रास देऊ लागला.
युवतीने या जाचापायी कंटाळून बल्लारपुर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली पोलिसांनी अमन वर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
सदर युवक अमन हा राजकीय पक्षांचा पदाधिकारी आहे.

