कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूर येथील मध्यभागी असलेल्या गांधी चौकात गणतंत्र व प्रजासत्ताक दिनी येथील वयोवृद्ध प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते झेंडावंदन करण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू होती.मात्र सध्याच्या नगरपरिषद शासनप्रशासनाने गेल्या वर्षापासून या परंपरेला बगल दिल्याचे अनुभवास येते आहे.नगरपरिषदेने पुर्वापारची परंपरा मोडीत काढू नये अशी विनंती येथील "जनसार्थक युवा मंच" ने न.प.नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. News34
सविस्तर असे की,गणतंत्र व प्रजासत्ताक दिनी पुर्वी सरपंच आणि आता नगराध्यक्ष नगरपरिषदेत झेंडावंदन करतात. तसेच येथील गांधी चौकात शहरातील वयोवृद्ध प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येते. मागील कित्येक वर्षांपासून ही परंपरा सतत सुरू होती. मात्र मागील वर्षी नगरपरिषद उपाध्यक्षांच्या हस्ते गांधी चौक येथे झेंडावंदन झाले.
नगरपरिषदेने पुर्वापारची परंपरा मोडीत काढून नागरिकांच्या भावना दुखावल्याचे आरोप होत असून नगरपरिषदेने पूर्वी कित्येक वर्षांपासून चालत आलेली परंपरा व शहरवासीयांच्या भावना लक्षात घेऊन पुन्हा गत मान प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने शहरातील वयोवृद्ध प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते गांधी चौकात झेंडावंदन करावे अशी विनंती वजा मागणी जनसार्थक युवा मंचाचे रोहन काकडे,मनोज भोजेकर, पवन राजूरकर,पंकज गोरे सह इतरांनी केली आहे.आता मागणीला यश प्राप्त होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

