वरोरा(प्रति) तब्बल 11दिवसानंतर वनोजा येथील स्नेहल किटे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी स्वप्नील संजय बोधाने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. News34
वरोरा तालुक्यातील काही अंतरावर असलेल्या वनोजा येथील स्नेहल दिलीप किटे वय२१वर्ष हिने दि,०२/०८/२१रोजी सायंकाळी६ते६;३०सुमारास आपल्याच राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आधी पोलिसांनी मर्ग दाखल केला, दोन दिवसांनी मृतक स्नेहलच्या वडिलांनी स्नेहलचा मोबाईल चेक केला असता त्या मोबाईल मध्ये आरोपी स्वप्नील संजय बोधाने रा, वनोजा याचे काही आक्षेपार्ह मॅसेज आणि फोटो आढळले,म्हणून वडील दिलीप किटे यांनी दि,०८/०८/२१रोजी पोलीस निरीक्षक वरोरा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, विभाग वरोरा यांच्या कडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुठलीच दखल घेतली नाही, या मध्ये पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत होते, म्हणूनच दिलीप किटे यांनी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन संघाचे जिल्हा मार्गदर्शक धर्मेश निकोसे, वरोऱ्याचे सचिव सुनिल शिरसाट यांच्या मदतीने थेट जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेतली, आणि अखेर दि,१३/०८/२१रोजी रात्री उशिरापर्यंत आरोपी स्वप्नील बोधाने याच्यावर भा, दं,सं कलम ३०६नुसार(आत्महत्येस प्रवृत्त करणे )बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु या गुन्हयातील आणखी दोन संशयित आरोपी आहेत. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा अशी मागणी ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येणार आहे.
मृतक स्नेहल किटे हिच्या मोबाईल फोन मध्ये आणखी काहीचे अश्लील मॅसेज आणि फोटो असल्याचे बोलल्या जाते, मृतक स्नेहलचा मोबाईल सायबर सेलला पाठविला असून आणखी दोन संशयितांची नावे समोर आल्यास त्याच्यावर ही गुन्हा दाखल होवू शकतो,, सदर तपास वरोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल किटे हे करत आहेत.

