चंद्रपूर - मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात लॉटरी च्या नावाखाली Online सट्टा सुरू करण्यात आला आहे, मात्र या बेकायदेशीर लॉटरीला सहकार्य करणारे "साहेब" यांचं नाव पुढे आले आहे, या साहेबांचा सारथी म्हणून काम बघणारा "जावेद" याच नाव समोर आले आहे.
सध्या राज्यात फक्त "पेपर लॉटरी" चा व्यवसाय हा वैध म्हणून सुरू आहे, या पेपर लॉटरी चा महसूल राज्याला प्राप्त होतो.
पेपर लॉटरीच्या नावाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील काही या खेळातील सिनियर खेळाडूंनी स्वतः आपलं साम्राज्य उभे करून जिल्ह्यात तब्बल 227 अवैध दुकाने थाटली आहे.
नागरिक या लॉटरीवर किती पैसे लावतात, मोठा खेळ व लहान खेळ यामध्ये सुद्धा आधीचे इंजिनियर व आताचे ऑनलाइन Lottery सट्टा व्यवसायिक हे सर्व खेळ ठरवितात.
दर 15 मिनिटाला ओपन आकडा स्पीन होतो, नंतर नेट व संपूर्ण खेळाचे आकडे बोर्ड वर लिहिल्या जाते.
ऑनलाइन सट्टा लॉटरी मध्ये 10 घरे असतात त्यामध्ये 1 ते 10 अंकी आकडे लावले जातात मात्र आकडा कोणता उघडकीस येईल याचं संपूर्ण नियंत्रण संजू, गणेश व इतर 5 हे करतात.
News34 ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यावर सर्व दुकाने "जावेद" नामक डिपार्टमेंट मधील एकाने दुकाने बंद करण्याचा आदेश जारी केला, व आदेशाचे पालन करीत सर्वांनी दुकाने बंद तर ठेवली मात्र 4 दिवसानी परत जावेद ने सर्वांना नवा आदेश जारी करीत दुकाने पुन्हा सुरू करा साहेबांनी सांगितले आहे.
महिना भरला असल्याने आधी पैसे जमा करा व आपली दुकाने नियमितपणे सुरू करा असा आदेश जावेदने काढला आहे, मात्र या अवैध धंद्याला परवानगी देणारा तो साहेब कोण याचा उलगडा लवकर होणार आहे.
महत्त्वाचे जावेद हा आधी लॉटरी व्यवसायिकाकडे कामाला होता, त्याने संपूर्ण लॉटरी व्यवसायिक काम कसे करतात याचा संपूर्ण अभ्यास केला व त्यानंतर तो डिपार्टमेंट मध्ये नोकरीला लागला.
जावेद चे नाव एका ऑनलाइन लॉटरी व्यवसायिकाने नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितले आहे.
जिल्ह्यात या ऑनलाइन लॉटरी (सट्टा) च्या छंदापायी अनेकांची घरे उध्वस्त झाली, संपूर्ण आकडे स्वमर्जीने घोषित करून नागरिकांना मूर्ख बनवीत हा अवैध धंदा सुरू आहे, मात्र याला पाठबळ देणारे साहेब व त्यांचा सारथी जावेद, लवकरचं या दोघांचे कारस्थान वरिष्ठांपर्यंत पोहचणार आहे.
ऑनलाइन सट्टा दुकानातील पडद्याआड काय चालताय हे उघडकीस आले की जिल्ह्यातील मोठे रॅकेट पोलीस प्रशासनाच्या हाती लागेल यात काही शंका नाही.