चंद्रपूर - शहरातील वर्दळीचा मार्ग म्हणजे वरोरा नाका चौक, या चौकात अनेक अपघात घडले, अनेकांनी आपले प्राण सुद्धा गमावले होते, यासाठी जनप्रतिनिधींनी पुढाकार घेत त्या ठिकाणी उड्डाणपूल शासनाच्या सहकार्याने निर्माण सुद्धा केले, पुलाचे उदघाटन करीत स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल (Balasaheb Thackeray flyover) असे नामकरण केले.
मात्र या उड्डाणपुलाचा आंबेडकर महाविद्यालयाकडे जाणारा एक भाग सुरू करण्यात आला नाही.
आधी स्ट्रीट लाईट नव्हते यासाठी तो भाग सुरू झाला नाही आता लाईट सुद्धा लागले मात्र चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीन धोरणामुळे तो भाग अजूनही उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. #news34
मात्र बंद असलेला तो भाग प्रेमी युगलांसाठी सुवर्ण संधी सारखा आहे, त्या भागावर दुपारी, सायंकाळी प्रेमी युगल आपले चाळे करीत बसतात, जणू स्व.बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुल "किसिंग झोन" बनला की काय अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.
त्या पुलाच्या भागावर सुरू असलेल्या प्रेमी युगल यांचा चाळ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावर होणारे अश्लील चाळे त्यांच्या कार्याचा अपमान आहे.
याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी तो पूल पूर्णतः सुरू व्हावा यासाठी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पत्र सुद्धा दिले मात्र त्यांच्या या मागणीची दखल बांधकाम विभागाने घेतली नाही, हा व्हिडीओ व्हायरल होताच सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांच्या नेतृत्वात बांधकाम विभागाचे अभियंता जाधव यांना भेटून उड्डाणपुलाचा एक भाग लवकर नागरिकांसाठी सुरू करण्यात यावा असा अल्टीमेंटम देण्यात येणार आहे.