घुघुस - शनिवारी सायंकाळच्या सुमारास घुघुस येथील वार्ड क्रमांक 2 येथे पोलिसांनी दीपक रामटेके यांच्या घरावर धाड मारली असता, त्याठिकाणी 9 खेळाडू हे जुगार खेळतांना आढळले.
52 पत्त्यांच्या या खेळात पोलिसांनी घरमालक खेळाडू दीपक रामटेके, बाबाराव झाडे, रिजवान खान, माजीद खान, संदीप वासेकर, हिरालाल कैथल, सुभाष फुलझेले, नौशाद कुरेशी, अमन आगदारी, थॉमस वडके, मोहम्मद सरफराज खान या 9 खेळाडूंना अटक केली. #news34
एकीकडे देशातील खेळाडू ऑलम्पिक tokyo olympics मध्ये पदकासाठी आपले कौशल्य दाखवीत आहे मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील घुघुस येथे 9 खेळाडू हे 52 पत्त्यांच्या जुगारात आपले कौशल्य दाखवीत पैसे लावत आहे.
सदर कारवाई गुन्हे शोध पथकाचे पो.उप. नि.गौरीशंकर आमटे, एनपीसी मनोज धकाते,महेंद वन्नकवार,सचिन बोरकर,रविंद्र वाभिटकर,सचिन डोये व नितिन मराठे यांनी यशस्वीपणे पार पाडली.