चंद्रपूर - मा. शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा श्री उद्धव साहेब ठाकरे तसेच अध्यक्ष भानुशाली साहेब यांचे आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर शिव संकल्प अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र ऊर्जानगर येथे पक्ष व संघटना बांधणी साठीच्या कार्यक्रमासाठी नागपुर वरून महा. राज्य वीज कर्म. अधि. अभियंता सेनेचे सरचिटणीस मधुकर सुरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या करिता प्रमुख पाहुणे म्हणून संतोषभाऊ हिरुळकर झोन सचिव नागपूर परिमंडळ हे उपस्थित होते या कार्यक्रमाकरिता विशेष उपस्थिती व या कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र लहाने कार्याध्यक्ष तसेच केंद्रीय सचिव मिलिंद कोटरंगे, उपसरचिटणीस राहुल बेले, झोन अध्यक्ष जयंत तायडे उपस्थित होते या कार्यक्रमात नवीन सभासदांचा संघटना प्रवेश त्यागाचे प्रतीक असलेल्या भगवा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटने मध्ये प्रवेश करणारे 1)Dy eng सागर शहा साहेब,2) AE eng दिनेश भानारकर साहेब , 3) श्री उपलोपवार साहेब वैद्यकीय अधिकारी .4)श्री पारस्कर साहेब सुरक्षा अधिकारी तसेच 5) पावर फ्रंट संघटनेचे सहसचिव श्री गजानन कोरडे 6)श्री विश्वंभर क्षिरसागर ,7) बहुजन पावर कर्मचारी संघटनचे सर्कल अध्यक्ष विजय राठोड, 8) उपाध्यक्ष बाळू फड,9) उपाध्यक्ष अमोल नागरगोजे,9)विठ्ठल मुंडे,10)पांडुरंग शेळके , 11) शंकर पैठने 12 ) अजय तायडे, 13 ) निखिल शेंडे 14 ) पंकज पाटील ,15 ) विजय चोगुले इत्यादी संघटनेत प्रवेश केला ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजेंद्र भाऊ लहाने यांनी केंद्र सरकार कामगाराच्या विरोधामध्ये नवीन नवीन कायदे करत आहे त्याबद्दल सर्वांना एकत्र येऊन संघटनेला मजबूत करण्याची गरज असल्याबाबत बोलले तर अध्यक्ष भाषणामध्ये सुरवाडे साहेबांनी विज विधेयक कायदा 2021 च्या मध्ये दिल्ली येथे आपल्या संघटनेचे मुख्य भूमिका बजावत संयुक्त कृती समितीची भेट केंद्रीय ऊर्जामंत्री सोबत घडवून आणली व विज विधेयक संसदेच्या पटलावर येणार नाही याबद्दल विस्तृत माहिती सांगितली आभार प्रदर्शन जयंत तायडे यांनी केले. या कार्यक्रमा आभार प्रदर्शन जयंत तायडे यांनी केले.
या कार्यक्रमाची आखणी व रूपरेषा अरुण पोहरे, झोन सचिव यांनी केली व हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अमोल कोत्रिवार, बाळू चौखंडे, अमोल कोल्हे, नाना भोसले, उज्वल सोनवणेजी दिवाकर मानगुदडे,जगदीश ढाले व संघटना सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
