कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती यांची भद्रावती येथे बदली झाली असून यांच्या जागी "सत्यजीत आमले" नवीन ठाणेदार म्हणून नुकतेच रुजू झाले आहे.आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर २८ आगस्ट रोजी पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. यानंतर कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त ठाणेदार आमले यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला.यावेळी संघाचे अध्यक्ष सैय्यद मूम्ताज़ अली,उपाध्यक्ष गणेश लोंढे,उपाध्यक्ष मयुर एकरे,सचिव अतूल गोरे,सहसचिव प्रवीण मेश्राम, संघटक गौतम धोटे,सदस्य सतीश बिडकर यांची प्रमुखाने उपस्थिती होती.
