नकोडा/ घुग्घुस येथून जवळच असलेले नकोडा हे गाव अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. येथे हत्याकांड, गोळीबारी, खंडणी वसुली, दारू तस्करी, गँगवारच्या घटना घडल्या आले तसेच बंदूक सुद्धा आढळली आहे. News34
नकोडा परीक्षेत्रात दिवसेंदिवस भंगार चोरीच्या घटना वाढत आहे. काही दिवसापूर्वी स्मशानभूमी येथे प्रेयर हॉल व संरक्षण भिंतीचे लोखंडी गेट अज्ञात चोरट्यानी चोरून नेला काही दिवसाचा कालावधी लोटत नाही तोच शुक्रवार 6 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 वाजता दरम्यान नकोडा येथील वेकोलीच्या पाण्याच्या टाकीच्या आवारात अज्ञात चोरट्याच्या टोळीने प्रवेश करून गॅस कटरने तेथील जलशुद्धीकरणाच्या लोखंडी टाकीचे पत्रे कापून चोरून नेले. त्यामुळे अज्ञात भंगार चोरट्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी व वाढत्या भंगार चोरीच्या घटनावर आळा घालावा अशी मागणी नकोडा सरपंच श्री. किरण बांदूरकर यांनी घुग्घुस पो.नि.राहुल गांगुर्डे यांना निवेदनातून केली आहे.
निवेदन देताना भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नकोडा सरपंच श्री. किरण बांदूरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, घुग्घुस भाजयुमोचे अमोल थेरे, नकोडा पाणी पुरवठा कर्मचारी कैलाश नवले, घुग्घुस भाजपाचे अजय आमटे, धनराज पारखी, गुड्डू तिवारी, गणेश खुटेमाटे उपस्थित होते.

