ताजी बातमी - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात CBSE EXAM येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. इम्प्रूव्हमेंट, कंपार्टमेंट, प्रायव्हेट आणि पत्राचार परीक्षा होणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा 25 ऑगस्ट 2021 पासून सुरू होणार आहेत. वेळापत्रकानुसार या परीक्षा 15 सप्टेंबर 2021 पर्यंत सुरू राहणार आहेत. खासगी आणि सरकारी शाळांमध्ये परीक्षा एकाचवेळी होणार आहेत. सर्व सीबीएसई विद्यार्थांसाठी या परीक्षांच्या तारखा आहेत.
सीबीएसईच्या cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी वेळापत्रकाबाबत अधिक माहिती घेऊ शकतात. News34
सर्वोच्च न्यायालयाला सीबीएसई बोर्डाने परीक्षांच्या तारखासंदर्भात माहिती दिली होती. 19 मुख्य विषयांसाठी ऑफलाइन परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्याच्या आधारावरच निकाल जाहीर केला जाईल.
दहावीच्या ऑफलाईन पेपरचा कालावधी तीन तासांचा असेल. इंग्रजी, गणित, विद्यान आणि इतर सर्व विषयांसाठी तीन तासांचा अवधी असणार आहे. Information Technology आणि Computer Applications या पेपरसाठी दोन तासांचा अवधी असेल. बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑफलाइन पेपरचा कालावधीही तीन तासांचा असेल. सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत पेपर घेतले जातील.