चंद्रपूर:-मेजर ध्यानचंद यांचा खेळ बघून हिटलरने त्यांना जर्मनीचे राष्ट्रीयत्व देण्याची गोष्ट केली होती.सैन्यात मोठे पद देण्याचे प्रलोभन हिटलरने दिल्यावरही मेजर ध्यानचंदने तो प्रस्ताव नाकारला.आणि आयुष्यभर भरताकडूनच खेळून मैदान जिंकले व देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.
यावरून त्यांचे देशप्रेम दिसून येते.सर्व खेळाडूंनी मेजर ध्यानचंद सारखेच देशप्रेम जोपासले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले.ते पद्मभूषण,भारत गौरव मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाचे (29ऑगस्ट) औचित्य साधून राष्ट्रीय खेळ दिवस निमित्य भाजपा दिव्यांग मोर्चा तर्फे आयोजित दिव्यांग खेळाडूंच्या सत्कार समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी अतिथी म्हणून महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,भाजपा दिव्यांग मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराम पान्हेरकर, श्रेया येणारकर, पुरुषोत्तम सहारे, रामकुमार आकापेल्लीवार, संजय डाखोरे, देवराव कोंडेकर यांची उपस्थिती होती.
डॉ.गुलवाडे म्हणाले 1928,1932 व 1936 ला मेजर ध्यानचंद मूळे भारताला ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळाले.त्यांचा जन्मदिन आता राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता बदलून मेजर ध्यानचंद करण्यात आले आहे, हा बदल खेळाडूंसाठी प्रेरणादायी राहणार आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते,दिव्यांग खेळाडु
धनराज चव्हाण (कबड्डी राज्य),
सुरज झाडे (व्हॉलीबॉल जिल्हा),
दिलीप मिश्रा (क्रिकेट इंटरनॅशनल),
गोपीनाथ जंगीलवार (क्रिकेट राज्य),
कैलास ब्राम्हणे (क्रिकेट राज्य),
मीनल दोडके (क्रिकेट एथलेटीक),
भावना आत्राम (क्रिकेट राज्य) यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक श्रीराम पान्हेरकर यांनी केले तर देवराव कोंडेकर यांनी आभार मानले.
