News34
घुघुस - दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या माध्यमातून मा. प्रबंधक साहेब गुप्ता कोल वॉशरीज उसेगाव (घुग्घुस) यांना निवेदन देण्यात आले.
मागील निवेदन दि. 16/3/2021 व दि. 5/4/2021 रोजी स्मरण पत्राव्दारे कळविण्यात आले होते कि उसेगाव व घुग्घुस येथील स्थानिक गावातील युवकांना रोजगार नसल्यामुळे घुग्घुस व उसेगाव येथील युवा वाईट मार्गाचा दिशेने वळत आहे त्यांनी आपले स्वतःचे भविष्य खराब करण्या मागे लागलेले आहे युवा हे देशाचे भवितव्य आहेत हे जाणून आपणास विनम्रपणे विनंती करण्यात येते की स्थानिक युवा मुलाला रोजगार देण्यात यावा जर का सामोरिल असेच रोजगार नाही मिळाला तर युवा पिढी चे भविष्य काय आहे त्या गोष्टी चा विचार करावा.
#news34 बेरोजगारांना रोजगार देण्यात यावे जेणेकरून युवा पिढी आपले भविष्य बनविल जर का येत्या दहा ते पंधरा दिवसात या विषयी कोणतेही दखल नाही घेतली तर गुप्ता कोल वॉशरीज उसेगाव घुग्घुस च्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनात जे काही नुकसान भरपाई होणार त्या नुकसान भरपाई चे सर्वस्वी जवाबदार हे गुप्ता कोल वॉशरीज राहिल असे निवेदन सादर करतांना घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव घुग्घुस उपाध्यक्ष मायाताई सांड्रावार घुग्घुस शहर महासचिव अशोक आसमपल्लिवार घुग्घुस सचिव जगदीश मारबते घुग्घुस महिला आघाडी अध्यक्षा रमाबाई सातारडे घुग्घुस युवा आघाडी अध्यक्ष ईश्वर बेले युवा आघाडी उपाध्यक्ष दीपक दीप, इरफान पठाण, करण कांळबांधे, राकेश पारशिवे, सदानंद डोरके, अरविंद चहांदे, अशोक भगत, फारुख शेख उपाध्यक्ष सचिन माहूरे, दत्ता वाघमारे, जोशनाताई डांगे, भाग्यश्री भगत, मिनाताई गुडदे, भावनाताई कांबळे, पारिखाताई कांबळे, दिपाताई निखाडे, आदित्य सिंग, अमित चव्हाण, शिवदास सदाफळे, रोशन नळे, दिलीप बंडलवार, हरिदास मोहजे, कैलास चनुरवार, शितिज कवले, दयाराम सरोज, सुजित सेनापती आदी उपस्थित होते.