चंद्रपूर - 5 ऑगस्टला नागपूर रोडवर रिक्षाचालक खुर्शीद शेख यांना चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
चारचाकी वाहन चालक शुभम सत्रामवार यावर पोलिसांनी कारवाई केली होती, खुर्शीद यांच्या परिवारात तो कमविणारा एकटा होता, त्याच्या मृत्यूने परिवारावर आर्थिक संकट ओढावले.
खुर्शीद च्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी यासाठी युवासेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे व AIMIM चे पदाधिकारी नाहीद हुसेन व अजहर शेख यांनी शासकीय रुग्णालयात पोहचून मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली.
तणावाचे वातावरण निर्माण होताच दंगा पथक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले, युवासेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे व नाहीद शेख यांच्या कठोर भूमिकेने आरोपी शुभम सत्रामवार यांनी अखेर खुर्शीद च्या परिवाराला 4 लाखांची आर्थिक मदत दिली.
यासाठी खुर्शीद यांच्या कुटुंबातील सदस्यांनी AIMIM जिल्हाध्यक्ष नाहीद हुसैन, अजहर शेख, युवासेना जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे व पवन नगराळे यांचे आभार मानले.