चंद्रपूर - शहरातील प्रख्यात सावकार प्रकाश जयस्वाल यांच्या घरी घरफोडीची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत माऊंट कॉन्व्हेंट येथे राहणारे फिर्यादी 65 वर्षीय प्रकाश जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या घरून 76 सोने व रोख 15 लाख रुपयांवर अज्ञात चोरट्याने हात साफ केला.
रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे अन्वेषण शाखेच्या चमूने वेगवेगळी पथक तयार करून या घरफोडीचा तपास सुरू केला.
काही दिवसांपूर्वी प्रकाश जयस्वाल त्यांचे वाहन चालक सादिक रफिक शेख यांच्यात वाद झाल्याने जयस्वाल यांनी त्याला कामावरून कमी केले होते, मात्र जयस्वाल यांचे सर्व व्यवहार सादिक ला माहीत होते, कदाचित त्याने सर्व बाब विचारात ठेवत चोरीचा प्लॅन आखला व या घरफोडीच्या घटनेला पूर्ण केले. #news34
मात्र हे सर्व आरोपी 24 तासांच्या आत पोलिसांच्या तावडीत अडकले, यामध्ये बालाजी वार्ड येथे राहणारा 23 वर्षीय महेश गजानन श्रीरामवार याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सादिक शेख व 22 वर्षीय अष्टभुजा वार्डात राहणारा चेतन कालिदास तेलसे यांनी मिळून जयस्वाल यांच्या घरी चोरी केली असल्याची माहिती दिली.
माहितीनुसार चोरी केलेली रोख रक्कम घुघुस येथील नकोडा येथे राहणारे सादिक चे नातेवाईक 43 वर्षीय शेख नवाज शेख दादामिया यांचे घरी ठेवली होती, पोलिसांनी तात्काळ घुघुस येथे जाऊन रोख रक्कम 14 लाख 16 हजार 400 रुपये जप्त केले.
चोरी गेलेले सोन्याचे दागिने दोन्ही आरोपिकडून जप्त करण्यात आले, पोलिसांनी एकूण 40 लाख 36 हजार 723 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनी संदीप कापडे, सचिन गदादे, सपोनि मलिक, एकरे, प्रकाश बलकी, नितीन साळवे व पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.