बल्लारपूर (रमेश निषाद)
बल्लारशाह - आज दि. २६/०८/२०२१ ला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बल्लारशाह तालुक्यातील बामनी येथील बामनी टी - पाॅईंट येथे मुख्य रस्त्यावर
१) विदर्भाचे स्वातंत्र्य राज्य केंद्र सरकारने तात्काळ निर्माण करावे.
२) कोरोणा काळातील सर्व विज बील राज्य सरकारने माफ करावे २०० युनीट पर्यंत मोफत विज द्यावी व २०१ युनीट नंतरचे विजबील निम्मे करावे.
३) शेतीपंपाचे थकीत वीज तात्काळ माफ करावे.
४) केंद्र सरकारने पेट्रोल, डिझल व स्वयंपाकाचे गॅस ची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी.
५) साप चावून मरणार्या व्यक्तीस इतर नागरीकाप्रमाणे तात्काळ मदत देण्यात यावी.
६) वनहक्क कायद्यात मालकी पट्टे देताना गैर आदीवासी साठी लागू असलेली ३ पिढयांची अट तात्काळ रद्द करण्यात यावी. Independent vidarbha
या प्रमुख मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांच्या नेतृत्वात कोरोना नियमांचे पालन करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेकडो विदर्भवादी आंदोलनकारी उपस्थित होते.
या रास्ता रोको आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी व लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.आंदोलनानंतर शेकडो कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली.
या आंदोलना दरम्यान आंदोलनकर्त्यांनी विदर्भ आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, वेगळा विदर्भ झाला पाहिजे, दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत दिली पाहिजे, नंतर चे बिल स्वस्त केले पाहिजे, शेती पंपाचे लोडशेडिंग बंद केले पाहिजे, अशा पद्धतीच्या घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मांडून बसले व रस्त्यावरची वाहतूक अडवून धरली.
देशात सर्वात महाग वीज महाराष्ट्रामध्ये आहे.विदर्भातली जनता, शेतकरी,व्यापारी, शेतमजूर, झोपडपट्टी वाले, उद्योजक, दरवाढीमुळे त्रस्त आहेत. वरून अजून वीज महावितरण कंपनी ने 20 टक्के दरवाढीचा प्रस्ताव देऊन 60 हजार कोटी रुपये दरवाढ विदर्भाच्या जनतेवर लादणार आहे, हि अन्यायकारक दरवाढ आम्ही सहन करणार नाही. 200 युनिटपर्यंत वीज बिल सर्व विदर्भातील जनतेला मोफत दिली पाहिजे, त्यानंतरच्या युनिटला निम्मे दर दिले पाहिजे, वीज आकार, वीज वहन कर,अधिभार, आम्ही देणार नाही व जोपर्यंत विजेचे दर निम्मे होत नाही किंवा स्वतंत्र विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असा निर्धार विदर्भवाद्यांनी केला आहे . अशा प्रकारचे वीज आंदोलन, विदर्भ राज्य आंदोलन समितीने सुरू केले आहे. त्या अंतर्गत आजचे हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
विदर्भात विजेचे उत्पादन खर्च प्रति युनिट 2 रुपये 50 पैसे आहे. महावितरण 100 युनिट ला 5.10, 200 युनिटला 6.57, तर 500 युनिटला 11:57 जनतेकडून वसूल करते वरून अधिवहन कर, स्थिर आकार आधी जास्तीचे वसूल करूनही एवढी महाग वीज विकल्या वरही 53 हजार कोटीचा वीज महावितरणला तोटा कसा होतो? हा तोटा भरून काढण्यासाठी 60000 कोटीची दरवाढ पुन्हा प्रस्तावित करून विदर्भातील वीज ग्राहकांची लूटमार करीत आहे. ह्या लूटमारीचा विदर्भ राज्य आंदोलन समिती विरोध करीत असून शासनाने त्वरित वरील मागण्या मान्य कराव्या अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पराग गुंडेवार यांनी दिला.
या आंदोलनामध्ये युवा आघाडी तालुका उपाध्यक्ष संजय घुगलोत,तालुका सचिव गौतम कांबळे,शहर अध्यक्ष रोहीत लोनारे,शहर सचिव संदिप केशकर,प्रशांत झामरे,प्रशांत मेश्राम,राजेंद्र खाडे,पांडुरंगजी जरीले इत्यादी सह मोठ्या प्रमाणात विदर्भवादी कार्यकर्ता उपस्थित होते.
