बल्लारपूर - खेळाच्या दुनियेत अनेकदा चमत्कार घडले आहे, आपल्या भविष्यातील स्पर्धेचा सराव करतांना द्रोणाचार्य बनून अनेकांना आपल्या मार्फत इतरांना ज्ञान देणारा क्वचितच भेटतात.
परंतु जरी एकलव्याला गुरू द्रोणाचार्य यांचे प्रत्यक्ष धनुर्विद्या प्रशिक्षण मिळाले नाही तरी त्याने गुरू द्रोणाचार्य पांडवांना शिकवताना पाहून स्वतः सराव केला व तरबेज धनुर्धर झाला. तसेच काहीसे पडोली या ग्रामीण भागातील ही लावण्या सोबत अशे अनेक विद्यार्थी त्यांच्या गावातील काही जागतिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करणाऱ्या दर्शन मासिरकरला पाहून खेळाविषयी कुतुहुल निर्माण झाले आणि, गावातील मुलांची इच्छा आत्मविश्वास पाहून दर्शन मासिरकर ह्याने गावातील जवळपास चाळीस पोरांना धावपटू चे शिक्षण देण्यास सुरुवात केली पहाटे उठून त्यांचा सराव करून घेऊन या खेळातील विविध बाबी त्यांच्या प्रशिक्षणात उजेडास आणून दिल्या. Anil Motilal Foundation ballarpur
बल्लारपूर येथे अनिल मोतीलाल फाउंडेशन तर्फे विदर्भ स्तरीय वयोमर्यादा नसलेली ओपन 3 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली, ह्यात विदर्भातील जवळपास अडीचशे मुलींनी सहभाग घेतला त्यात पडोलीची लावंण्या नागरकर हिने प्रथम क्रमांक पटकविला, आणि आपल्या विजयाचे श्रेय लावण्याने दर्शन मासिरकर व त्यांचे सहकारी विजय भगत, प्रकाश नागरकर, मकरंद खाडे यांना दिला. News 34
ग्रामीण भागात असलेल्या अनेक अष्ठपैलू खेळाडू हे प्रशिक्षणाच्या अभावी मागे पडले असले तरी दर्शन सारखा आत्मविश्वास असलेला खेळाडू कोणताही स्वार्थ न बाळगता गावातील मुलांना प्रशिक्षणदेत असल्यामुळे हे घडून येत आहे.
महत्वाचे म्हणजे रेल्वे साठी तयार करण्यात आलेल्या ट्रॅक वर हे विदयार्थी गेले दोन तीन वर्षे सराव करीत असताना त्यांनी अनेक स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे.
अवघ्या वयाच्या अकराव्या वर्षी पडोलीचा लावंण्या नागरकर आपले यश संपादन करू ग्रामीण भागातील खेळाडूंची जागतिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची आशा यानिमित्याने पल्लवित केली आहे.
परंतु या ग्रामीण भागातील विविध खेळात प्राविण्य असलेल्या खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम भविष्यात लोकप्रातिनिधींनी केले पाहिजे यासाठी देखील प्रयत्न व्हावे हेही तितकेच महत्वाचे आहे.
