चंद्रपूर - कृषिपंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलती संदर्भात स्वतंत्र धोरण कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020अंतर्गत कृषिपंपधारकांना वीजबिलात सवलत देण्याच्या योजनेतून चंद्रपूर परिमंडलातील –चंद्रपूर व गडचिरेाली जिल्हयाचा समावेश असणारया चंद्रपूर, वरोरा, चंद्रपूर, ब्रम्हपुरी, गडरिोली व आलापल्ली विभागातील एकंदरीत 31 हजार 807 कृषिपंप ग्राहकांनी 26कोटी 95 लाख रुपयांचा भरणा केला. यात चंद्रपूर जिल्हयातील 22 हजार 121 कृषि ग्राहकांनी 17 कोटी 57 लाख तर गडचिरोली जिल्हयातील9 हजार 668 ग्राहकांनी 8 कोटी 73 लाख 42 रुपयांचा भरणा करुन थकबाकी मुक्तिची वाट धरली. News 34
या योजनेच्या वैशिष्ठयानुसार म्हणजे चंद्रपूर जिल्हयातील कृषिपंपधारकांकडून भरल्या गेलेल्या 17 कोटी 57 लाख या वीजबिलाच्या कोटी लाखाच्या रक्कमेतून 33 टक्के म्हणजे 5 कोटी 79 लाख हे कृषिग्राहकांच्या संबंधित गावाच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहे तर अधिक 33 टक्के म्हणजे 5 कोटी 79 लाख हे कृषिग्राहकांच्या जिल्हयातील मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहेत. एकंदरीत 66 टक्के म्हणजे11 कोटी 51लाख हे गाव व जिल्हा मिळुन मूलभूत सुविधा साठी उपलब्ध झाले आहेत.
तसेच गडचिरेाली जिल्हयातील कृषिपंपधारकांकडून भरल्या गेलेल्या 8 कोटी 73 लाख 42 हजार रुपयांच्या रक्कमेतून 33 टक्के म्हणजे 2 कोटी 88 लाख हे कृषिग्राहकांच्या संबंधित गावाच्या मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहे तर 33टक्के म्हणजे 2 कोटी 88 लाख गडचिरेाली जिल्हयातील मुलभूत सुविधासांठी उपलब्ध होणार आहेत. एकंदरीत 66 टक्के म्हणजे 5कोटी 76लाख हे गाव व जिल्हा मिळुन विकासासाठी उपलब्ध झाले आहेत. या सुवर्णसंधी चा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे यांनी केले आहे.
पुढे कृषिग्राहकांद्वारा भरल्या जाणारया थकबाकीच्या प्रमाणात हे कृषिग्राहक हे त्यांच्या गावाच्या व जिल्हयाच्या विकासाचे सहभागी ठरणार आहेत. या योजनेचा लाभ कृषिपंपधारकांना व्हावा व येाजनेच्या यशस्वी व्हावी यासाठी महावितरण अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. कॅपॅसिटरचा वापरामुळे कृशीपंपांना योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळणे, कृशीपंप हाताळतांना घेण्यात येणारी खबरदारी, वीजसुरक्षा याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.या सुवर्णसंधी चा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे यांनी केले आहे.
