नागभीड - morning walk करीता बाहेर गेलेल्या आजी व नातीन यांचा चारचाकी वाहनांच्या धडकेत मृत्यू झाला.
भिकेश्वर गावाजवळ सकाळी 6 वाजता ही घटना घडली, सकाळी आजी व नातीन नेहमीप्रमाणे नागभीड-ब्रह्मपुरी मार्गावर फिरायला गेल्या होत्या, त्यावेळी नागपूर वरून भाजीपाला घेऊन जाणारे आयशर वाहन क्रमांक एमएच 33 टी 2470 भरधाव वेगात येत दोघांना उडविले. News34
या धडकेत 60 वर्षीय आजी सुगंधा विश्वनाथ अनवले यांचा जागीच मृत्यू झाला तर नातीन 6 वर्षीय हार्दिक अमन मिसार चा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. धडकेनंतर सदर आयशर वाहन हे रस्त्यावर पलटी झाले.
वाहन चालकांवर कलम 304,279, भा द वी मोटार वाहन कायदा अंतर्गत 184,134,177 गुन्हा दाखल करण्यात आला. वाहन चालक फरार आहे. सदर घटनेने भिकेस्वार व सुलेझरी गावावर शोककळा पसरली असून पोलिस स्टेशन चे ठाणेदार प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी पोलीस निरीक्षक कोरवते पुढील तपास करीत आहे.
