चंद्रपूर : 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर, या ठिकाणी रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन स्वयंसेवी संस्था व महानगरपालिकेच्या संयुक्त उपक्रमाने राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम अंतर्गत आयोजित पर्यावरण जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. News34
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले. आणि सर्व भारतीयांनी अमृत महोत्सव साजरा केला. मात्र मानव निर्मित प्लास्टिक प्रदूषणाचे थैमान जगभर पसरले आहेत. प्लास्टिक पासून होणाऱ्या वेगवेगळ्या प्रदूषणा पासून स्वतःला स्वतंत्र करण्याची वेळ आज आली आहे. या अमृत महोत्सवाचे औचित्याने प्रत्येक भारतीय नागरिकांनी स्वतःचे कर्तव्य म्हणून प्लास्टिकचा वापर कमीत कमी करून त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्त होऊ शकतो. तसेच प्लास्टिक मुळे होणारे जलप्रदूषण, वायू प्रदूषण कसे रोखता येईल, त्याच प्रमाणे कंपोस्ट खत, इकोब्रिक्स कसे बनवायचे व सेप्टिक टैंक याबाबत संस्थेचे अध्यक्ष राहुल कोटकर यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, कार्यक्रमाचे अध्यक्ष, कर्मचारी वृंद, तसेच रक्षण धरणीमातेचे सदस्य अविनाश लेनगुरे, भूषण सोनकुसरे राजीव शेंडे, हरप्रीत सिंग, वेदांत सोनकुसरे, रिधम कोटकर, अश्विनी कावळे, सखी जोगे, मृणाल वडगावकर, विशाल पेंदोर, प्रिया जोगे,सुरज नवले, ज्योत्स्ना गौरकार, तृप्ती गौरकार, विभांशू जिवतोडे, गौरव वरारकर ,आकाश नवले, माधुरी शेंडे, रश्मी कोटकर आदी सदस्य उपस्थित होते.
