कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेने २० जुलै २०२१ रोजी विशेष सभेत येथील सर्व्ह नंबर ३६६/१ मालमत्ता क्रमांक ९८८ दिगांबर लांजेकर यांच्या इमारतीत स्थलांतरित देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी नियमबाह्य व बेकायदेशीरपणे परवानगी दिली. नगरपरिषदेने ही परवानगी तात्काळ रद्द करावी,यामागणीला घेऊन न.प. शिवसेनेच्या नगरसेविका सौ.वैशाली सुरेश गोरे यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक ५ च्या रहिवासी महिलांनी २५ आगस्ट रोजी स्थानिक नगरपरिषदे समोर एकदिवसीय धरणे आंदोलन व लाक्षणिक उपोषण केले. Shivsena Gadchandur
सविस्तर असे की,१७ आगस्ट रोजी नगरपरिषद नगराध्यक्षांनी विशेष सभा बोलावून इतर ठिकाणच्या स्थलांतरित दारू दुकानासाठी ठराव मंजूर केले.याचा विरोधी पक्ष नगरसेवक व त्या प्रभागातील नागरिक विशेषतः महिलांनी कडाडून विरोध केला आहे.शहरात अगोदरच अवश्यक्ते पेक्षा जास्त देशी,विदेशी दारूची दुकाने आहे.मग आता ही नवीन दुकानं कशाला असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होते आहे.असे असताना तरी सुद्धा आमचा याला विरोध नाही पण सदर दुकान आमच्या प्रभागात नको,इतर ठिकाणी कोठेही लावा,अशा आशयाचे निवेदन नगरपरिषद सह जिल्ह्यातील संबंधितांना देऊन विनंती करण्यात आली होती.मात्र याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले असे आरोप संबंधित ले-आऊट धारकांनी केले आहे.नगरपरिषद शासनप्रशासनाने ठराव रद्द करावा यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन व लाक्षणिक उपोषण करण्यात आले.आमची शेवटची विनंती आहे की, सदर ठराव रद्द करून आमच्या प्रभागातून सदर दारू दुकान इतर ठिकाणी हलवा.यासंदर्भात जर सकारात्मक असे काही घडले नाही तर पुढे अन्नत्याग उपोषण करू असे मत यावेळी उपोषणकर्ता महिलांनी व्यक्त केले आहे. याविषयी नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांना निवेदन देण्यात आले असून यावर काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.नगरपरिषद शासनप्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नगरसेविका सौ.गोरे यांच्या नेतृत्वात त्या प्रभागातील नागरिकांनी उपोषण मंडपा पर्यंत रॅली काढली.यात महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.सदर आंदोलना दरम्यान पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
--------------//------------
"आमचा विरोध या देशी दारू दुकानाला यासाठी आहे.कारण की समोर शाळा व वाचनालय आहे,समोर आश्रमशाळेचे काम सुरू आहे,त्यमध्ये सौंदर्यकरण आहे,ग्रीन जिम आहे.दारू दुकानामुळे याठिकाणी दारूड्यांचा बाजार राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नसून आम्हाला दारू दुकानाचा विरोध नाही,परराज्यातील लोक येथे धंदे करीत आहे तर आपल्या मराठी लोकांनी केले तर यात गैर काय ? आम्हाला कोणाचाही विरोध नाही.यांनी हे दुकान इतरत्र हलवायला पाहीजे एवढीच आमची मागणी आहे.आज याठिकाणी महिलांनी जे धरणे आंंदोलन व लाक्षणिक उपोषण केलेले आहे.हे फक्त कुंभकर्णी झोपेत असलेल्या नगरपरिषद प्रशासनाला जागे करण्यासाठी आहे.विनंतीपुर्वक सांगतो की, हे "मानत असेल तर हात जोडून आणि मानत नसेल तर हात तोडून" हा आमचा इशारा आहे.यांनी लक्षात घ्यावे. यानंतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू आणि तिथले जे दारूचे दुकान आहे त्याला आम्ही हाणून पाडू.जर हे मानत नसेल तर महिलांना सोबत घेऊन तिथे तोडफोड करू."
(शिवसेना तालुका प्रमुख व गटनेता नगरसेवक सागर ठाकूरवार)
-----------//---------
