प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर: युवक कांग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आदेशनुसार व पूर्व खा.नरेशबाबू पुगलिया व जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया च्या मार्गदर्शनाथ युवक कांग्रेस अध्यक्ष चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात बल्लारपुर शहरात ५०,००० स्वाक्षरी घेण्यास संकल्प केला आहे. केंद्र सरकार दिवसें दिवस इंधन खाद्यतेल पेट्रोल-डिझेल च्या वाढत्या किमतीमुळे सामान्य कुटुंबातील नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे अगोदरच कोरोना सारख्या महाभयंकर महामारी मुळे अनेक कुटुंब हतबल झाले असताना सुद्धा केंद्रातील भाजप सरकार मात्र गाळ झोपेत आहे त्यांना नागरिकांची काही देणे घेणे नसल्याचा हा प्रकार आहे एकीकडे सामान्य कुटुंबखाद्यतेल इंधन व पेट्रोल-डिझेलच्या किमती मुळे ट्रॅक्टर चे दर वाढल्यामुळे शेती करणे सुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही जीवनावश्यक वस्तू च्या दररोजच्या वाढत्या किमतीमुळे पूर्णतः नागरिक हतबल झाले असून केंद्र सरकार मात्र अदानी अंबानी सारख्या धनदांडग्या लोकांना पाठीशी घालत आहे अशा या भाजपाप्रणीत केंद्र सरकारचा युवक कांग्रेस बल्लारपुर विधानसभा तर्फे दिनांक १३ जुलै पासून स्वाक्षरी मोहीम राबविन्यात येत आहे.