बल्लारपूर - 2021 -2022 या वर्षातील रोटरी क्लब बल्लारपूर चा पदग्रहण सोहळा रोटरी (Rotary Club) क्लबचे अध्यक्ष रोटेरियन वैभव मेनेवार यांच्या अध्यक्षतेखाली ज्योती हाइट्स,बल्लारपूर येथे 10 जुलै 2021ला संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर पूर्व सचिव रोटेरियन निलेश चिमड्यालवार,पूर्व प्रोजेक्ट सेक्रेटरी रोटेरियन प्रफुल चरपे ,नूतन अध्यक्ष रोटेरियन मनीष मुलचंदानी, नुतन सचिव रोटेरियन उमेश पटेल, नूतन प्रोजेक्ट सचिव रोटेरियन रवींद्र साळवे व 2021-2022 साठी बल्लारपूर क्लबमधून नियुक्त असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन प्रशांत भोरे उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पूर्व सचिव निलेश चिमड्यालवार यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा आढावा आपल्या मनोगतातून सादर केला. यानंतर नूतन अध्यक्ष मनीष मुलचंदानी यांनी पूर्व अध्यक्ष वैभव मेनेवार यांचेकडून तर
नूतन सचिव उमेश पटेल यांनी पूर्व सचिव निलेश चिमड्यालवार तर नूतन प्रोजेक्ट सेक्रेटरी रविंद्र साळवे यांनी पूर्व प्रोजेक्ट सचिव प्रफुल चरपे यांच्याकडून पदभार स्वीकारला. नूतन अध्यक्ष मनीष मुलचंदानी यांनी आपल्या भाषणातून रोटरी क्लब बल्लारपूर हे आपल्या कार्यकाळात जनसामान्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविणार असल्याचे आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रोटरी क्लब बल्लारपूर मध्ये नव्याने प्रवेश घेतलेले सदस्य डॉक्टर प्रशिक वाघमारे यांचे पुष्पगुच्छ देऊन कार्यकारिणीने स्वागत केले. 2021 -2022 या वर्षातील बोर्ड ऑफ डायरेक्टर ची निवड यावेळी करण्यात आली.
या पदग्रहण सोहळ्यासाठी रोटेरियन कल्पेश पटेल, राजू मुंधडा,प्रशांत दोंतुलवार,महेश कायरकर, शैलेश झाडे,पवन पवार,अजय वासलवार,हर्षद गंधेवार,डॉ.प्रशिक वाघमारे ,सुरेश कुक्रेजा ,विक्रांत पंडित,उत्तम पटेल,अनुप गंगशेट्टीवार,राहुल वरु,अखिल निखारे,डॉ.सचिन तल्हार, सुबोध कुमार उपस्थित होते.
या सोहळ्याचे संचालन डायरेक्टर ग्रीटिंग रोटेरियन राम तंम्पालु यांनी तर आभार प्रदर्शन नूतन प्रोजेक्ट डायरेक्टर रविंद्र साळवे यांनी केले. राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता करण्यात आली.