कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
राजूरा गोविंदपूर राष्ट्रीय महामार्गावरील अंबुजा फाटा समोर काही अंतरावर असलेल्या(हायवे टच)सुखकर्ता मंगल कार्यालयाजवळ तेलंगणा राज्य आदिलाबाद येथील मेसर्स "केटीसी ट्रांस्पोर्ट कंपनी" ने आपले मोठमोठे ट्रक ठेवण्यासाठी स्वतःच्या जागेवर ट्रक यार्ड निर्माण केले आहे.सदर जागा टर्निंग पॉईंटवर असून याठिकाणी यांचा डिझेल पंप सुद्धा आहे.यार्डच्या समोर लागून असलेल्या मुख्य मार्गावरून २४ तास हजारो लहान-मोठी वाहने ये-जा करतात.एका राज्यातून दुसऱ्या राज्याला जोडणारा हा महामार्ग असून याठिकाणी विराजमान सदर केटीसी ट्रांस्पोर्ट कंपनीकडून रस्ता सुरक्षा नियमांची अक्षरशः पायमल्ली होताना दिसत आहे.मोठमोठी वाहने स्वतःच्या यार्डमध्ये न ठेवता चक्क हायवेवर उभी केली जात आहे.अर्धा रस्ता यांनीच काबीज केल्याने अपघाताची भिती निर्माण झाली आहे.विशेषता: दुचाकी स्वारांना ही जागा अक्षरशः अपघात स्थळ बनली आहे.
यार्डमध्ये वाहनांना ये-जा करण्यासाठी यांनी पक्का रस्ता बनवलेला नाही.यामुळे वाहनांच्या टायरला माती लागून मुख्य मार्गावरील रस्त्यावर पसरत चिखल होत आहे.रस्ता निसरडा झाल्यामुळे याठिकाणी अपघाताची शक्यता बळावली असून सदर बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक असल्याची मानली जात आहे. यातील लक्षवेधी बाब म्हणजे ही जागा ट्रनिंगवर असल्याने दुचाकी स्वारांसाठी अपघात स्थळ ठरत असून दररोज किरकोळ अपघात याठिकाणी घडत आहे.यांचा बेजबाबदारपणा भविष्यात एखाद्याला महागात पडणार अशी शंका वर्तवली जात आहे.
अंबुजा सिमेंट कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष विजय ठाकरे यांनी सुद्धा गेल्या ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना केटीसी ट्रांस्पोर्ट कंपनीचा बेजबाबदारपणा,अपघाताला आमंत्रण देणारे कृत्य व रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहन यार्ड व डिझेल पंप बंद करण्याची मागणी वजा विनंती निवेदनाद्वारे केली होती.भविष्यात घडणाऱ्या मोठ्या दुर्घटनेची वाट न पाहता संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित याकडे लक्ष दिलेच तर सुरू होणार्या अपघातांच्या मालिकेवर अंकुश लागू शकतो.तसेच रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आरटीओंनी सुद्धा यांच्या विरूध्द कडक कारवाई करण्याची गरज आहे.लोकांचे जीव धोक्यात असताना सदर ट्रांस्पोर्ट कंपनी उपाययोजना करण्याऐवजी हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष करीत आहे.यांचे अशा जीवघेण्या कृत्यांवर त्वरित अंकुश लावण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----------//---------
आरटीओ अधिकाऱ्यांनी स्वतः सदर ठिकाणची पाहणी करून सत्य परिस्थिती अनुभवली आहे.अपघात होऊ नये म्हणून आपल्या स्तरावर उपाययोजना करण्यात याव्या.आपल्यामुळे याठिकाणी काही अपघात घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपली असतील.अशी समज आरटीओंनी रस्ता सुरक्षा संबंधी नोटीसाद्वारे १३ जुलै रोजी या कंपनीला दिली होती.मात्र नोटीसीला न जुमानता यांनी अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नाही हे मात्र विशेष.
-----------//---------

