प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - भरधाव वेगात चंद्रपूर वरून मूल कडे येत असतांना दुचाकीला जबर धडक दिल्याने दोघांचा घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना मूल चंद्रपूर मार्गावर मूल पासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोणी फाट्याजवळ घडली. सायंकाळी ५ वा. चे सुमारास घडलेल्या अपघाता मध्ये एमएच-१५-एफव्ही-१७२१ क्रमांकाची बोलेरो पिकअप चंद्रपूर वरून मूल कडे भरधाव वेगात येत होती. दरम्यान होंडा शाईन या दुचाकीने गोंडपिपरी तालुक्यातील लिखीतवाडा येथील विकास प्रभाकर गावळे (४०) आणि सुरेश मादगु कन्नाके (४०) हे मूल वरून पोंभुर्णा मार्गे स्वगांवाकडे जात होते. दरम्यान विरूध्द दिशेने येणाऱ्या बोलेरोने जबर धडक दिल्याने अपघातग्रस्त दुचाकीस्वारांचा घटना स्थळीच मृत्यु झाला. अपघाता मध्ये मृत्युमुखी पडलेले दोघेही दुचाकी स्वार दारू पिवुन असल्याची माहीती असुन विरूध्द दिशेने येणाऱ्या बोलेरोला बाजु देतांना अंदाज चुकल्याने सदर अपघात घडला असावा. असा अंदाज वर्तविल्या जात आहे. अपघातग्रस्त बोलेरो ही मूल येथील असुन अपघाताचे वेळेस अलीमखाँ अब्दुल्लाखाँ पठाण रा. मूल वार्ड नं. १२ हा बोलेरो चालवित असल्याची माहीती पोलीसांनी दिली असुन फरार बोलेरो चालका विरूध्द गुन्हाची नोंद केली आहे.
