चंद्रपूर - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपला जीव गमावला मात्र या काळात कोरोनाचा बाजार अनेकांनी लावला, कोरोना आजाराची संधी साधत आरोग्य क्षेत्राशी निगडित डॉक्टरांनी कोरोना रुग्णाच्या परिवारातील सदस्यांना चांगलेच आर्थिक शोषण केले. (Aam Aadmi Party, Chandrapur)
मात्र चंद्रपूर शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरने बिल माफ करून सुद्धा रुग्णाच्या बहिणीला वारंवार संपर्क साधत पैश्यासाठी तगादा लावला.
गरीब बहिणीचा 20 वर्षीय भावाला कोरोनाने ग्रासले मात्र त्यावेळी कुठेही उपचारासाठी त्याला बेड मिळत नव्हता.
अनेक डॉक्टरांची विनवणी करून त्याला अखेर बेड मिळाला, शासनाने रुग्णाला दाखल करण्यापूर्वी अनामत रक्कम घेऊ नये असा आदेश सुद्धा काढला मात्र या डॉक्टरने 20 हजार रुपये आधी जमा करायला सांगितले.
पैश्यांची जुळवाजुळव करीत त्या बहिणीने 20 हजार रुपये जमा केले, मात्र होत्याचे नव्हते झाले तो रुग्ण दगावला, डॉक्टरने त्यावेळी उर्वरित 25 हजार रुपये घेणार नाही असा शब्द देत बिल माफ केले होते.
मात्र जेव्हा त्या रुग्णाचं मृत्यू प्रमाणपत्र मागायला ती बहीण गेली असता डॉक्टरांनी मृत्युपत्र हवे असेल तर आधी 25 हजार जमा करा, असे ठणकावले.
त्या रुग्णाची बहीण परत घरी आली त्यानंतर ही त्या हॉस्पिटल मधून कर्मचाऱ्यांचा वारंवार फोन पैश्याची मागणी करण्यासाठी येऊ लागला, त्या कर्मचाऱ्यांनी प्रचंड मानसिक त्रास दिल्याने.
हे प्रकरण पोहचले आम आदमी पक्षाकडे, आपचे सुनील भोयर व अजय डुकरे यांनी हॉस्पिटल गाठत डॉक्टरांशी बोलणे केली मात्र डॉक्टरांनी अर्वाच्य भाषेत संवाद करायला सुरुवात केली.
अर्वाच्य शब्दात बोलल्यावर सुद्धा आपचे सुनील भोयर यांनी डॉक्टरांशी नम्रपणे संवाद साधला व त्या रुग्णाच्या बहिणीला मृत्यू प्रमाणपत्र देण्याची विनंती केली.
काही वेळात संवादाचा शेवट हा सकारात्मक झाला व डॉक्टरांनी त्या रुग्णाच्या बहिणीला मृत्यू प्रमाणपत्र दिले.
त्या बहिणीने आप च्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
भोयर यांनी यावेळी त्या रुग्णाच्या बहिणीला धीर दिला, कोरोना काळात अनेकांनी आपल्या कुटुंब प्रमुखांना गमविले मात्र काही डॉक्टर यांनी त्या संधीचा फायदा घेतला, डॉक्टरांनी आपला माणुसकीचा धर्म समजून रुग्णाच्या त्या परिस्थितीचा फायदा घेऊ नये अशी विनंती केली.
