सावली :- तालुक्यातील व्याहाड बुज येथे 13 जुलै च्या रात्री वाघाने घरात शिरकाव करीत 52 वर्षीय गंगुबाई गेडाम ला ठार केले. (Tiger Attack)
सध्या जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे, जंगलात जाणाऱ्या नागरिकांवर अनेक हल्ले झाले मात्र आता वन्यप्राणी चक्क गावात येत शिकार करीत आहे.
गंगुबाई या आपल्या घरी झोपण्याच्या तयारीत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घालीत त्यांना ठार केले.
या घटनेमुळे व्याहाड बुज गावात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे, नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.