कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर वरून राजूराकडे जाताना एका पिकअप मालवाहक वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना १७ जुलै रोजी दुपारी अंदाजे २ च्या सुमारास राजूरा गडचांदूर रोड वरील हरदोना खुर्द या गावा जवळ घडली.सदर वाहन जिवती तालुक्यातील नारपठार येथील असल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच सदर प्रतिनिधींनी त्याठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता वाहन मोठ्याप्रमाणात क्षतिग्रस्त झाल्याचे तसेच मागे मोठा ट्रांसफार्मर ठेवून असल्याचे दिसून आले. अपघात घडल्यावर याच्या जवळ बसलेल्या चार,पाच जणांवर हे ट्रांस्फार्मर पडल्याने यातील दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळाली असून त्याठिकाणी रक्त सांडलेलं दिसून येत आहे.गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सात जणांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे पाठवले असून यातील दोन जण गंभीररीत्या जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.सदर दुर्घटना कशी घडली याची सखोल माहिती वृत्त लिहिस्तोवर मिळालेली नव्हती.