कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
महाराष्ट्र स्टेट बोर्डाकडून नुकताच १० वी चा निकाल जाहीर झाला.आणि १२ वीच्या निकालाबाबत ऑनलाईन काम कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांकडून सुरू आहे.हा निकाल अपलोड व विविध प्रपत्रे सादर करण्याची शेवटची तारीख २३ जुलै शिक्षकांना देण्यात आली होती. परंतू सद्यस्थितीत पाऊस व पूर तसेच नागपूर विभागीय मंडळाच्या सर्वर मधील बिघाड,अशा विविध कारणांच्या पार्श्वभूमीवर निकाल अपलोड करण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली होती.त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मंडळाने एक दिवसाची(२४ जुलै)मुदतवाढ दिली.असे असताना २४ तारखेला वर्ग १२ वी चा निकाल जाहीर होत असल्याच्या उलटसुलट अफवा समाज माध्यमांमध्ये पसरविल्या जात आहे.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम,गैरसमज निर्माण होत आहे.
गडचांदूर येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे कला विभाग प्रमुख प्रा.सैय्यद ज़हीर यांनी सदर निकाला बद्दल संबंधितांकडून माहिती घेतली असता येत्या ३१ जुलैपर्य निकाल जाहीर होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.अशी माहिती देण्यात आली असून १२ वीच्या निकाला बद्दल समाज माध्यमांमध्ये पसरविल्या जाणाऱ्या अफवांना विद्यार्थ्यांनी बळी पडू नये असे आवाहन News34 च्या माध्यमातून प्रा.ज़हीर यांनी केले आहे.