चंद्रपूर - मागील वर्षी बल्लारपूर शहरात भर दिवसा सूरज बहुरीया याची गोळी मारत हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी या हत्याकांडातील 7 आरोपींना अटक केली होती, या प्रकरणात मुख्य आरोपी अमन अंदेवार व सहआरोपी आकाश अंदेवार सहित 7 आरोपी पोलिसांनी पकडले.
अवैध धंद्यातील वर्चस्वातून बहुरीया यांची हत्या करण्यात आली, आज त्या घटनेला वर्ष उलटत नाही तर चंद्रपूर शहरात भरदिवसा गोळीबार झाल्याने बहुरीया हत्याकांडाला पुन्हा उजाळा मिळाला.
बहुरीया हत्याकांडातील आरोपी आकाश अंदेवार हा जामिनावर बाहेर आला व आकाश च्या मागावर बल्लारपूर शहरातील काही युवक होते, 12 जुलै रोजी शहरातील गजबजलेल स्थान म्हणजे रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे आकाश अंदेवार याच्यावर बुरखाधारी युवकाने गोळ्या झाडल्या.
आकाश वर एकूण 3 गोळ्या झाडण्यात आल्या, हा सर्व घटनाक्रम कॉम्प्लेक्स मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आकाश हा बाहेर पळत मोबाईल शोरूम मध्ये लपला, मात्र त्याच्या हाताला व पाठीला गोळी लागली.
त्याच्यासोबत असलेल्या युवकांनी आकाश ला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेलं.
भरदिवसा शहरात गोळीबार झाल्याने शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने तत्परता दाखवीत तात्काळ गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासाच्या आत 2 आरोपींना अटक करीत तपास सुरू केला आहे.
या गोळीबारात जखमी आकाश याने आपल्या चाहत्याला संदेश देत "मी पुन्हा येईन" चा राग आलापला.
पोलिसांनी या गुन्हेगारीवर वेळीच नियंत्रण न आणल्याने ही गँगवार पुन्हा होण्याची शक्यता वाढली आहे.