गोंडपीपरी - गोंडपिपरि तालुक्यात पडत्या काळात राष्ट्रवादी पक्षाची बाजू सावरली.सातत्याने नेतृत्वाने दिलेल्या जबाबदाऱ्या कायम पेलल्या.कार्यकर्ते जोडत पक्ष संघटन वाढवले.जनसमाण्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आंदोलने केली.दरम्यान जिल्हास्थानावरून तालुक्यात वाढता हस्तक्षेप गटबाजीला खतपाणी घालणारा ठरला.त्यानंतर माडुरवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हा अध्यक्ष संदीप गिरहे,संदीप करपे,बबन उरकुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सेनेत सहा महिन्यांपूर्वी प्रवेश केला.राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात माडुरवारांनी वेगळी छाप सोडली आहे.त्याचीच दखल घेऊन पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार गजानन कीर्तिकर ,चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या सूचनेनुसार तालुका प्रमुख पदी निवड करन्यात आली नियुक्त पत्र देताना जिल्हाप्रमुख संदीप गिरहे,उपजिल्हाप्रमुख संदीप करपे,बबन उरकुडे ,सूचित पिंपळशेंडे,शैलेश भैस,नगरसेवक राजू डोहे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.