कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना पक्ष प्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या सूचनेनुसर चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांनी गडचांदूर नगरपरिषदेचे नगरसेवक तथा विरोधी पक्ष गटनेते "सागर ठाकूरवार" यांची कोरपना तालुका शिवसेना प्रमुख पदी नियुक्ती केली आहे. नवनियुक्त तालुका प्रमुख पक्षाचा प्रसार व प्रचार जोमाने करतील अशी इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली असून शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे,उपजिल्हा प्रमुख संदीप करपे सह जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.