मूल :— नगर परिषद मूल क्षेत्रात किटकजन्य आजारासंबंधीत कोणत्याही प्रकारचा साथरोगाचा उद्रेक होवू नये याकरीता मूल शहरात दर रविवारला कोरडा दिवस पाळला जात आहे.
घरातील व व्यवसायातील कूलर टाकी,फुटके माठ,टायर व इतर साहीत्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यू ,मलेरीया,आजाराचे डासअळी तयार होत असल्याने दर रविवारला नागरीक व व्यवसायीकांनी सर्व साहीत्यामधील पाणी काढून रिकामे करून कोरडा दिवस पाळयात यावा.तसेच साथरोग संबंधाने उपाय योजना म्हणून नगरपरीषदच्या वतीने घरोघरी डासअळी तपासणी,वैयक्तिक शौचालयाचे वेंटपाईपला जाळी बसविणे, नालीत जंतूनाशक फवारणी करणे, सांडपाणी वाहते करणे,साचलेल्या डबक्यात वेस्ट आॅईल टाकणे असे विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. तरी नागरीकांनी दर रविवारला कोरडा दिवस पाळून डासअळीचा नायनाट करण्याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन श्री सिध्दार्थ मेश्राम मुख्याधिकारी नगरपरिषद मूल यांनी केले आहे.
*मूल शहरातील कचरा ,घाण अस्वच्छ असलेले मोकळे प्लॅाट असणा—या मालकांवर आता होणार कार्यवाही* *(प्लांट मालकावर प्रतिदिन १०० रुपये दंड)*
मूल :— नगर परिषद मूल क्षेत्रात केलेल्या सर्वेक्षणात असंख्य मोकळे खुले अस्वच्छ कचरा व घाण साचलेले प्लॅाटचे निरीक्षण करण्यात आले असून असंख प्लॉटमध्ये मध्ये कचऱ्याचे साम्राज्य, डासांचा प्रादुर्भाव,डूक्करांचा हैदोस,झाडेझुडपे वाढ झालेले असून खाली प्लांटवर खड्यात पाणी साचले असल्याने वेगवेगळया पध्दतीचे घाण पसरली असून किटक,साप,जीवजंतू बाबत पदाधिकारी व नागरिकांच्या भरपूर प्रमाणात तक्रारी या कार्यालयात प्राप्त होत असल्याने महाराष्ट्र नगर परिषद,नगरपंचायती व औदयागिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 233 अन्वये प्रती दिवस 100/दंड आकारणी दिनांक 1 आॅगस्ट 2021 पासून करण्यात येत आहे.
तरी खुले अस्वच्छ प्लॉटधारकांनी आपले मालकीचे सदर प्लॉट त्वरीत काटेरी झाडे झुडपे तोडून स्वच्छ करणे तसेच खोलगट भागात सांडपाणी व पावसाचे पाणी साचून राहू नये याकरीता भूमीभराव करून झाल्यानंतर नगर परिषद मूल कार्यालयाला कळविण्यात यावे.
तदनंतर निदर्शनात आल्यास दिनांक 1 आॅगस्ट 2021 पासून प्रति दिवस 100/ रूपये दंड आकारणी करून मालमत्ता करातून वसूल करण्यात येईल तसेच शहरातील अस्वच्छ भूखंडापासून नागरीकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास त्या भुखंड मालकीचे नांव तक्रार अर्जासह या कार्यालयात सादर करावे अर्जदाराचे नाव गोपनिय ठेवल्या जाईल याकरीता स्वतंत्र तक्रार पेटीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
असे आवाहन श्री सिध्दार्थ मेश्राम मूख्याधिकारी नगरपरिषद मूल यांनी केलेले आहे.