चंद्रपूर - 21 जुलैपासून चंद्रपूर जिल्ह्यात सुरू आलेल्या पावसाने नागरिकांना थंडावा मिळाला असला तरी चंद्रपूर शहरात मात्र या पावसाने पालिकेचा विकास रस्त्यावर आणून दाखविला.
मॉन्सूनपूर्वी नाले सफाई अभियान चंद्रपूर मनपाने राबविले मात्र पहिल्या पावसातच पालिकेच्या त्या कामाची पोल उघडकीस आणली.
इतकेच नव्हे तर महापौरांच्या वडगाव प्रभागातील मित्र नगर भागात नाल्या ओव्हरफलो झाल्याने नाल्याच पाणी नागरिकांच्या घरात शिरले.
शहरातील कस्तुरबा मार्गावर तब्बल 2 फूट पाणी साचल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. चारचाकी वाहन पाण्यात बुडाले की काय असे चित्र दिसत होते.
जणू काही पालिकेने केलेला विकास रस्त्यावर आला की काय हे चित्रच शहर वासीयांनी बघितले.