प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - भारत देशावर अधिराज्य करीत असलेल्या भाजप प्रणित केंद्र सरकारने स्वयंपाक करणाऱ्या गॅस डिलेंल,खाद्य तेल,व जीवनावश्यक वस्तूंचे दुप्पटीने भाव वाढ केल्याने देशातीलच गरीब व सर्वसाधारण कुटुंबियांचे कंबरडे मोडले असून केंद्र शासनाचे नेतृत्व करीत असलेल्या मोदीं सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली राजोली येथे कांग्रेस पक्षाच्या वतीने मुल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील गुज्जनवार, व जेष्ठ कांग्रेस नेते शरीफ भाई यांच्या नेतृत्वत्वात राजोली चौकात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.याप्रसंगी ग्रामीण कांग्रेस, महिला कांग्रेस,युवक कांग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. " वारे मोदी तेरा खेल-सस्ती दारू महेंगा तेल" मोदी सरकारला खाली करा-भाववाढ कमी करा अशी घोषणाबाजी करून, नारे देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. मोदी सरकारच्याच कार्यकाळात पेट्रोल 100/-च्या वर, डिझेल 96/- गॅसची किंमत 350/- वरुन 830/ ते-900/-खाद्य तेल 170/- यांसह जीवनावश्यक वस्तूची भरमसाठ भाववाढ केली आहे. तशीच 232 /-रुपये मिळणारी सबसिडी फक्त 36/- केली. त्यामुळे महिलांना गॅस घेणे कठीण झाले असून प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक बजेट डबघाईस आले. ग्रामीण भागातील उज्वला गॅस घेणाऱ्या गरीब महिलांजवळ सिलेंडर भरण्यासाठी 830/- रुपये नसल्याने स्वयंपाक कसे करावे या विवनचनेत सापडले असून महागाईमुळे गरीबांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे यांना खुर्चीवरून खाली करा असा नारा देण्यात आला.