चंद्रपूर - काही दिवसांपूर्वी बाबूपेठ परिसरात मोबाईल हिसकावणे व फिर्यादीला मारहाण करण्याची घटना घडली होती, पोलिसांनी त्या प्रकरणी 2 आरोपीना अटक केली होती.
काही दिवस उलटत नाही तर पुन्हा मोबाईल हिसकावण्याची घटना बागला चौक परिसरात घडली
.
9 जुलै ला रात्री 9 वाजेदरम्यान 2 आरोपीनी युवकांकडून विवो कंपनीचा मोबाईल हिसकावला, याची तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशनला दिली असता शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोउपनी निलेश वाघमारे यांनी या प्रकरणात रेकार्डवर असलेल्या आरोपींना ताब्यात घेत विचारपूस केली असता आरोपी 20 वर्षीय शुभम वासेकर, 18 वर्षीय व्यंकटेश कोपेलवार यांना अटक केली.
आरोपीकडून फिर्यादीचा 8 हजार रुपये किंमतीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला.
दोन्ही आरोपीवर अपराध क्रमांक 536/21 कलम 392, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनात पोउपनी वाघमारे, कोरडे यांचेसह पोलीस कर्मचारी शरीफ मेजर यांनी यशस्वीपणे पार पाडली.