घुघुस - मंगळवार 27 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजता दरम्यान अन्नाजी रामचंद्र बोंडे (75) रा. अमराई वार्ड क्र.2 घुग्घुस या वयोवृद्ध इसमाने नायलनच्या दोरीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. हि घटना सकाळी दरम्यान उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
हि माहिती मिळताच सहा.पो.नि. संजय सिंग, रंजीत भुरसे, देशकर, रंगारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदना साठी चंद्रपूर येथे पाठविला घुग्घुस पोलीसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.