मुल - महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा सत्यजीत तांबे यांच्या आदेशानुसार सर्व विधानसभा अध्यक्ष व पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष पदाधिकारी यांनी ११ जुलै ते १५ जुलै या कालावधीत केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझल,गॅस दरवाढी विरोधात सर्व पट्रोल पंपवर स्वाक्षरी अभियान कार्यक्रम घेण्यात आला होता. दिनांक 17 जुलै 2021 रोज शनिवार दु. 2 वाजता कांग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशानुसार, तसेच चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे नेते, तथा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, यांच्या नेतृत्वात व राष्ट्रीय सचिव मा. विजय सिंह जी, मा.प्रदेश सचिव रिचित देवे व जिल्हा प्रभारी मो.ईरशाद शेख तसेच जिल्हाधक्ष्य मा. हरीश तोटावार यांच्या उपस्थित मुल काँग्रेस भवन ते पेट्रोल पंप पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करून केंद्र सरकारच्या महागाई धोरणा विरोधात निषेध नोंदविण्यात आला. तसेच सायकल सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सायकल रॅलीमध्ये मुल तालुका काँग्रेस चे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्यामभाऊ येनूरकर, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष राकेशभाऊ रत्नावार ,विविध कार्यकारी सहकारी सोससीटीचे अध्यक्ष राजेंद्रभाऊ कन्नमवार, संचालक किशोर घडसे, नगरसेवक विनोदभाऊ कामडी, शहर अध्यक्ष सुनीलभाऊ शेरकी,मुल तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार , युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुलकवार, ग्रामीण कांग्रेस नेते दीपक पा. वाढई, ओबीसी सेलचे अध्यक्ष गुरुदास चोधरी, बंडुभाऊ गुरनुले, सरपंच रवींद्र भाऊ कामडी, सुरेशभाऊ फुलझले, सुनील कडालवार , चंदूभाऊ चाटारे, संदिप मोहबे, रंजित आकुलवार, विजय बोंमावर इत्यादि काॅंग्रेस कार्यकर्ते सहभागी होते.