मूल: आभासी अभ्यासक्रम असतांनाही शाळा समितीचा आधार घेत मूल येथील काही काॅन्व्हेंटनी भरमसाठ फि वाढ केल्याने पालकांमध्ये असंतोष पसरलेला आहे, शिक्षण शुल्क कमी करण्यासह विविध मागण्यासाठी खाजगी शाळा पालक संघर्ष समितीने पुढाकार घेत येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले, निवेदनातील समस्येवर चर्चा करण्यासाठी प्रशासनाने शुक्रवारी 9 काॅन्हेंटच्या मुख्याध्यापकासह काही पालकांची बैठक प्रशासकीय भवन येथे घेण्यात आली, सभेत दिलेल्या निवेदनानुसार सविस्तर चर्चा करून 19 एप्रिल रोजी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी याबैठकीत सर्व मुख्याध्यापकांना दिले.
कोरोना संक्रमणामुळे राज्यातील संपुर्ण शाळा बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले, आदेशाचे पालन करीत मूल शहरातील काही काॅन्व्हेंटनी आभासी अभ्यासक्रम सुरू केले, अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे शिक्षण शुल्कामध्येही भरमसाठ वाढ केली, सदर निर्णयामुळे पालकवर्गात असंतोष पसरलेला आहे, यामुळे सर्व पालक एकत्र येवून खाजगी शाळा पालक संघर्ष समिती तयार करण्यात आली, समितीच्या माध्यमातुन 12 जुलै रोजी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, तहसीलदार, मूल, नगर पालीकेचे मुख्याधिकारी आणि नगर पालीकेच्या शिक्षण सभापती यांना निवेदन देवून शैक्षणिक समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली, 16 जुलै रोजी मूल येथील उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी मूल शहरातील 9 काॅन्व्हेन्टची बैठक घेतली, यावेळी तहसीलदार डाॅ. रविंद्र होळी, मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, नायब तहसीलदार यशवंत पवार, नगर पालीकेचे प्रशासकीय अधिकारी तुषार शिंदे, मूल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी खांडरे, मूल नगर पालीकेचे उपाध्यक्ष नंदकिषोर रणदिवे, पालक संघर्ष समितीचे किषोर कापगते, प्रशांत समर्थ, मंगेश पोटवार, भोजराज गोवर्धन उपस्थित होते.
यावेळी शिक्षण फि माफ करा, 35 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी एका वर्गात बसवु नये, शाळेत शिकविणारे शिक्षक हे शैक्षणीक अभ्यासक्रम शिकविण्यास पात्र असावेत, एकदा शाळेत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांकडून वारंवार प्रवेश शुल्क घेण्यात येवू नये, बिआरसी मार्फत गरीब विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नियमावली ठरवुन प्रवेश घ्यावा, नविन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून डोनेशन घेवू नये. जुने पुस्तके घेण्याची परवानगी देण्यात यावी, शिक्षक-पालक समिती ही सर्व पाल्याना विश्वासात घेवून तयार करण्यात यावे यासह विविध समस्येवर यावेळी चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माध्यमिक यानी 19 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशाचे प्रत्येक शाळेनी पालन करण्याच्या सुचना उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी उपस्थित असलेल्या शाळेच्या प्रतिनिधीना दिले. शाळेनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्याशाळेविरूध्द पालकांनी तक्रार करावी, तक्रारीनुसार शाळेवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पालक समितीला प्रशासनाने दिले.