चंद्रपूर - सतत वाढत असलेली संचारबंदी व जगण्यासाठी धडपड या सर्व त्रासाला कंटाळून ममता भोजनालय संचालक दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केली.
बाबूपेठ येथील चंद्रपूर, बल्लारपूर मार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय समोर स्थित ममता भोजनालय प्रतिष्ठान आहे, या भोजनालयाचे संचालक 60 वर्षीय चंद्रभान दुबे व त्यांची पत्नी 50 वर्षीय मंजू दुबे रा. टॉवर टेकडी या दाम्पत्याने भोजनालयात गळफास घेत आत्महत्या केली.
आज सकाळी काही नागरिकांना भोजनालयातून दुर्गंधी येत होती काहींनी आत डोकावले असता चंद्रकांत दुबे हे खाली पडलेल्या अवस्थेत तर त्यांची पत्नी फासावर लटकलेल्या अवस्थेत होती.
घटनेचा पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे. दुबे दाम्पत्यानी गळफास हा मागील 3 दिवसांपूर्वी घेतला असावा असा अंदाज पोलिसांनी लावला आहे, दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते.
अजूनही संचारबंदी पूर्णतः शिथिल झाली नसल्याने भोजनालयात ग्राहक येत नव्हते, उपजीविका भागविण्यासाठी त्यांना फक्त भोजनालयाचा आधार होता, ते सुद्धा व्यवस्थित चालत नव्हते, आर्थिक चणचण असल्याने त्यांनी हे कठोर पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.