मुल- मुल-सावली संयुक्त तालुक्यातील खेडी गावातील वृक्षारोपण व पर्यावरनाची जाण असणारा एक ध्येयवेडा पर्यावरण प्रेमी राजु कटकमवार यांनी गावातील लोकांचे आरोग्य उत्तम राहावे आणि सर्वांना आयुष्यभर नैसर्गिक प्राणवायू मिळावे तसेच गावही सुंदर दिसावे या उदात्त हेतूने २०१३ पासून गावाच्या मुख्य रस्त्यावर, शाळेच्या परीसरात, ग्राम पंचायत आणि गावात वृक्ष लावून त्याचे संवर्धन सुदधा स्वखर्चातून करीत आहे. आज १५१ वृक्ष १० फुटाचे झाले असून आजही राजू कटकमवार हे राष्ट्रीय कार्य नियमितपणे करीत आहेत.
परिसरात विविध प्रकारचे १५१ झाडे लावुन त्यांचे संगोपन ही करीत आहेत. ही बाब नेफडोचे तालुका संघटक गुरु गुरनुले यांच्या लक्षात आल्याने याची दखल नेफडोनी घ्यावी अशी विनंती चंद्रपूर जिल्हा टीमच्या पदाधिकाऱ्यांना केली असता जुलै हा वृक्षारोपण व पर्यावरणाचा महिना असल्याने दिनांक २५ जुलै २०२१ रोजी मौजा खेडी येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास तालुका मुल व सावली यांच्या संयुक्त विद्यमाने खेडी येथे वृक्ष प्रेमी राजु कटकमवार यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सचिन काटपल्लीवार, प्रमुख अतिथी ग्रा. प.सदष्य लोकेश भडके,प्रा.देवानंद दुधे, प्रतिष्ठित नागरिक वामनराव एलट्टीवार, शिक्षक प्रवीण काटपल्लीवार, सुरेश अल्लुरवार, दुधे गुरुजी, यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित पाहुण्यांचे वृक्ष भेट देऊन स्वागत करण्यात आले. राजू कटकमवार यांचे कार्य अतिशय कौतुकास्पद उल्लेखनीय असल्याने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेच्या नागपूर विभाग उपाध्यक्ष तेजस्विनी नागोशे,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ललिता मुस्कावार, जिल्हा सचिव रत्ना चौधरी, मुल तालुका संघटिका सुषमा कुंटlवार, माधुरी गुरनुले,अल्का राजमलवार, सावली संघटिका प्रीती झोडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा शाल ,श्रीफळ आणि वृक्षभेट देऊन भावपुर्ण सत्कार करण्यात आला. सत्कारा दाखल मनोगत व्यक्त करताना राजू कटकमवार यांनी माझे संपूर्ण आयुष्य गावात वृक्षारोपण व संवर्धन करण्यात कुठलाही आर्थिक मोबदला न घेता खर्ची घालणार आणि अशा सेवाभावी संस्थेलाही सहकार्य करणार असल्याचे मत व्यक्त केले असून वृक्षारोपण कार्यक्रमावर शासन लाखो करोडो रुपये खर्च करीत आहे. परंतु आमच्या सारख्या सेवाभावी राष्ट्रीय काम करणार्याबाबत शासन व वनविभाग गंभीर नसल्याने शासनाप्रति नाराजी व्यक्त केली.
याप्रसंगी नागपूर विभाग उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे यांनी संस्थेचा परिचय व कार्य याची माहिती प्रस्ताविका मधून दिली तर चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा ललिता मुस्कावार,व जिल्हा सचिव सौ रत्ना चौधरी यांनी संस्थेचे ध्येय उद्देश आणि नियमितपणे करीत असलेले कार्य या बाबत मार्गदर्शन केले. अध्यक्ष सरपंच सचिन काटपल्लीवार यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करुन ग्राम पंचायत आपल्या संघटनेला सहकार्य करणार असल्याचे सांगुण आम्हालाही वृक्ष उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी केली. संघटक श्रीरंग नागोसे सर मुल तालुका अध्यक्षा अल्का राजमलवार ,मुल तालुका संघटक गुरु गुरनुले,मुल तालुका संघटिका सौ माधुरी गुरनुले, तालुका संघटिका सौ सुषमा कुंटावार, सावली तालुका अध्यक्ष रणजित नरेड्डीवार , सावली तालुका संघटिका सौ. प्रिती झोडे, जिल्हा संघटक श्रीरंग नागोशे, गुरुदास चौधरी(शिक्षक) यांचेसह गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मुल तालुका संघटक गुरु गुरनुले यांनी केले तर आभार सावली तालुका संघटक रणजित नरेड्डीवार यांनी मानले.संस्थेच्या पदाधिकारी यांनी राजू कटकमवार यांनी लावलेल्या वृक्षांची प्रत्यक्ष पाहणी केली.