कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील महापारेषण (महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित) कार्यालयात चार कामगार ठेकेदारी पद्धतीने काम करीत असताना उपविभागीय अधिकारी यांनी त्यांना कोणतेही कारण नसताना कामावरून कमी केले.यामध्ये अधिकार्यांनी पैसे घेतले व महिन्याकाठी पैसे देण्याची मागणी केली.अशी तक्रार कामगारांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.अशी माहिती देण्यात आली असून या तक्रारीवर एकतर्फी चौकशी करण्यात आली आणि या चारही कामगरांना दोषी ठरवून कामावरून कमी करण्यात आले असे यांचे म्हणणे आहे.अन्याय झाल्याची भावना मनात घेऊन न्यायासाठी या कामगारांनी विविध ठिकाणी जंगजंग पछाडले मात्र काहीच सकारात्मक घडले नाही.
यानंतर त्या अन्याग्रस्त मंडळींनी प्रहारच्या सतीश बिडकर यांच्याशी संपर्क साधून आपबिती सांगितली.बिडकर यांनी तात्काळ फेर चौकशीसाठी चंद्रपूर येथील संबंधीत विभागाच्या वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली तसेच दुरध्वनीवरून सदर प्रकरणी सखोल माहिती देत निष्पक्ष चौकशीची मागणी वजा विनंती केली. या तक्रारीची सकारात्मक दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेर चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली.यांनी चोकशी करून अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवला.परिणामी काढण्यात आलेल्या या चारही कामगारांना परत कामावर घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले. उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या कामगारांना चार महिन्यापासून न्याय मिळत नव्हता तो अवघ्या १५ दिवसात बिडकरांनी मिळवून दिला.न्याय मिळवून दिल्याबद्दल कामगारांनी प्रहारचे सतीश बिडकर यांचे मनापासून आभार मानले आहे.