घुघुस - वीज अंगावर पडल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचे आपण ऐकलंच असेल पण वीज अंगावर पडूनही मृत्यूलाही चकवा देणं ही बाब आपण कधी ऐकली नसेल.
घुघुस येथील उसगाव मध्ये 48 वर्षीय सुधाकर मोतीराम मंगाराम हा दुपारच्या सुमारास शेतात बैल घेऊन गेला असता त्यावेळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने सुधाकर ने झाडाचा आसरा घेतला.
आणि तेव्हा विजेचा कडकडाट झाला व वीज झाडावरून सुधाकर च्या अंगावर कोसळली.
यामध्ये सुधाकर जखमी झाला, नागरिकांनी त्याला तात्काळ घुघुस येथील कोल्हे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले.
सुधाकर हा बापू ठाकरे यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करतो, मागील 3 दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने नागरिकांचे जीवन अस्तव्यस्त केले असून नदी, नाले ओसंडून वाहत आहे.