भद्रावती - भद्रावती तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर असलेले पिपरी गाव हा पूरग्रस्त भाग म्हणून सर्वांच्या परिचित आहे.१९९४ साली आलेल्या महाकाय पुरामध्ये संपूर्ण संपूर्ण गाव पुराच्या विखाळ्यात सापडला होता. नदिजवळील गाव असल्यामुळे पावसाळ्यात साथीचे आजार काही नवीन नाही.मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला या पूरग्रस्त भागाचं गांभीर्य नाही.वर्धा नदीच्या पात्राजवळ वेकोली ने मोठे ढिगारे उभे केले आहे,त्यामुळे पिपरी आणि आजूबाजूच्या गावांना पुराचा धोखा आणखी वाढला आहे.मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अजूनही कुंभकरणाच्या झोपेतून जागे झालेले नाही.
* १९९४ मध्ये आलेल्या महाकाय पुरावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब यांनी गावाला भेट दिली आणि त्यावेळी आपत्कालीन रस्त्याला मंजुरी देण्यात आली,मात्र २६ वर्ष लोटून सुद्धा निधीअभावी अजूनही रस्ता पूर्ण झालेला नाही.नदीपात्र भरलं की भद्रावती येथे जाणारे सर्व रस्ते बंद होतात आणि मूरसा मार्ग तर सर्वप्रथम बंद होतात.त्यातच आता रेल्वे भुयारी पुल जीवघेणा ठरत आहे,थोडा पाऊस आला की भुयारी पूलात १० फुटाच्या वरती पाणी भरत असतात. खड्डेप्रिय रस्ते आणि भुयारी पुलातील चिखल यामुळे बऱ्याच बाईकस्वारांना चिखलाने माखावे लागत आहे आणि अपघात तर दैनंदिनी घडत आहे.प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधी यांना वारंवार सांगून सुद्धा फक्त आश्वासनाशिवाय जनतेच्या पदरात काहीच पडत नाही.रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता भुयारी पुलात पाणीच साचतच नाही असं अजब उत्तर दिलं. जर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी जनतेच्या समस्या सोडवत नसेल, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत नसेल तर यांची नियुक्ती नेमकी कुठल्या कामासाठी आणि कोणासाठी असतात असा प्रश्न अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप अण्णाजी कुटेमाटे आणि संस्थापक अनुप सुधाकर यांनी केला आहे.